अजित पवार यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार

अजित पवार यांच्यासाठी   
प्रामाणिकपणे काम करणार
Published on

बारामती, ता. ८ : ‘‘विधानसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतील,’’ अशी ग्वाही भाजपचे प्रदेश प्रभारी व कर्नाटकचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सी. टी. रवी यांनी दिली.
बारामतीत महायुतीच्या समन्वय बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जागा महायुतीसाठी महत्त्वाची असून, ती जागा निवडून आणण्यासाठी प्रत्येक भाजप कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार महायुतीच्या सर्व उमेदवारांचा भाजप मनापासून प्रचार करेल, असे रवी यांनी नमूद केले.
यंदाच्या निवडणुकीत महायुतीच मोठ्या संख्येने विजयी होईल, सरकारही महायुतीचेच येईल, असा विश्वास व्यक्त करून रवी म्हणाले, ‘‘भाजप बारामतीत अजित पवार यांना मोठे मताधिक्य मिळावे, यासाठी पूर्ण मेहनत घेणार आहे. त्यानुसार आमच्या समन्वय बैठकाही झालेल्या आहेत. महायुतीची राज्यातील जनतेशी नाळ जोडली गेली आहे. विविध योजनांच्या माध्यमातून सरकारने जनतेचा विश्वास संपादन केला असून सरकार सत्तेवर आल्यानंतरही या योजना पुढे सुरु राहतील.’’
या प्रसंगी प्रदीप गारटकर, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, सतीश फाळके, गोविंद देवकाते, राजेश कांबळे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com