बारामती परिमंडलातील १५४६० ग्राहकांना सौरउर्जेचा प्रकाश

बारामती परिमंडलातील १५४६० ग्राहकांना सौरउर्जेचा प्रकाश

Published on

बारामती, ता. ९ : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून बारामती परिमंडलातील १५ हजार ४६० घरगुती ग्राहक सौरप्रकाशात आले आहेत.
या ग्राहकांनी एकूण ५१.९५ मेगावॉट क्षमतेची सौरछत (सोलर रूफ टॉप) यंत्रणा बसविली आहे. त्यात बारामती मंडळातील २ हजार ३५४ (८.१३ मेगावॉट), सातारा मंडळातील ४ हजार ५७३ (क्षमता १४.५ मेगावॉट) तर सोलापूर मंडळातील ८ हजार ५३३ (२९.३१ मेगावॉट) ग्राहकांचा समावेश आहे. तर ८ हजार ७७ ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाईल ॲपही यासाठी उपलब्ध आहे. घराच्या छतावर सौरप्रकल्प बसवून वीजनिर्मिती करायची व त्याद्वारे घराची विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. वापराइतकी सौर वीजनिर्मिती झाल्यास वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते. अधिकची निर्माण झालेली वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेत सौर प्रकल्पासाठी दोन किलोवॅट क्षमतेपर्यंत प्रती किलोवॅटला तीस हजार रुपये तर तिसऱ्या किलोवॅटला अठरा हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
एक किलोवॅटसाठी ३० हजार, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र शासनाकडून थेट मिळेल. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून घराच्या छतावर सौरछत (सोलर रूफ टॉप) यंत्रणा

बसविलेल्या घरगुती ग्राहकांची बारामती मंडळाची विभागनिहाय आकडेवारी : बारामती ११०८, दौंड ८३४, सासवड ४१२.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com