बारामतीत महावितरणकडून २५४७५ ग्राहकांना वीजजोडणी

बारामतीत महावितरणकडून 
२५४७५ ग्राहकांना वीजजोडणी
Published on

बारामती, ता. २७ : गेल्या पाच महिन्यात महावितरणकडून बारामती परिमंडळात विविध वर्गवारीत २५ हजार ४७५ लघुदाब ग्राहकांना नवीन वीजजोडणी दिली आहे. त्यात सर्वाधिक २० हजार ४२१ घरगुती वीजजोडण्यांचा समावेश आहे. बारामती मंडळात ५ हजार ९२५, सातारा मंडळात ११ हजार १८६, तर सोलापूर मंडळात ८ हजार ३६४ लघुदाब ग्राहकांना नवीन वीजजोडणी दिली आहे.
महावितरणने ग्राहकांसाठी नवीन वीजजोडणी अर्जाची प्रक्रिया महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावरील ग्राहक पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने सोपी, सुलभ व जलद केली आहे. सेवेच्या कृतीमानकांनुसार विहित कालमर्यादेत नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश क्षेत्रिय कार्यालयांना दिले आहेत. त्यानुसार ग्राहकांना तत्परतेने वीजजोडणी दिली जात आहे. तरी ऑनलाइन सुविधेद्वारे अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर करून तत्पर नवीन वीजजोडणी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बारामती परिमंडलातील वर्गवारीनिहाय घरगुती २०४२१, वाणिजिक्य ३५०७, औद्योगिक ५०३, कृषीपंप ४६१, सार्वजनिक सेवा १५९, पोल्ट्री व्यवसाय १२९, सार्वजनिक पाणीपुरवठा ७४, विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन ४८, शीतगृहे ९, इतर तात्पुरत्या जोडणी १६४ अशा एकूण २५४७५ ग्राहकांना नवीन वीजजोडणी दिलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com