
बारामती, ता. १३ : येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत ऑगस्ट महिन्यामध्ये वाहतूक सुरक्षाविषयक नियमांच्या उल्लंघन केल्याबद्दल ७९९ वाहनांवर केलेल्या कारवाईत १५०४ गुन्ह्यात वाहनमालक व चालकांकडून ५६ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
या कारवाईमध्ये अतिवेगाने धावणाऱ्या वाहनांवर ३०५ गुन्हे, विना हेल्मेट वाहन चालविणे १६२, सीट बेल्ट न लावणे १३, अवैध विमाप्रकरणी २२९, क्षमतेपेक्षा अधिक वजन भरलेली वाहने ७१, वाहन चालविताना भ्रमणध्वनीचा वापर २६, रिफ्लेटर आणि टेल लॅम्प नसणे ५३, दारू पिऊन वाहन चालवणे १३, ताडपत्री अच्छादन नसणे १६, काळी फिल्म लावणे ४, अनुज्ञाप्ती १३२, वाहन परवाना ३३, योग्यता प्रमाणपत्र २४०, वायु प्रदूषण प्रमाणपत्र २०७, असे एकूण १ हजार ५०४ गुन्हे दाखल केले आहेत.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत मोहीमस्तरावर वाहनांच्या तपासणीचे काम सुरु आहे. नागरिक व शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना वाहनचालकांनी वाहतूक सुरक्षाविषयक नियमाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.