मोटारीची काच फोडून 
तीन लाखांची रोकड लंपास

मोटारीची काच फोडून तीन लाखांची रोकड लंपास

Published on

बारामती, ता. २२ : शहरातील भिगवण रस्त्यावर चारचाकी गाडीची काच फोडून चोरट्यांनी तीन लाखांची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवारी (ता. २२) घडली. दरम्यान, सीसीटीव्ही फूटेजमध्ये चोरटे स्पष्टपणे दिसत असल्याने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
या संदर्भात संपत सोपान शिंगाडे (रा. काटेवाडी, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून त्यांनी तीन लाख रुपये रोकड घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या चारचाकीमध्ये ही रोकड ठेवली व ते खरेदीसाठी एका दुकानात गेले होते. खरेदी करून परत आल्यानंतर त्यांच्या गाडीची काच फुटलेली त्यांना दिसली. तसेच तीन लाखांची रोकड गायब झाली होती. हे चोरटे परराज्यातील असावेत असा अंदाज पोलिस निरिक्षक विलास नाळे यांनी व्यक्त केला. गाडीची काच फोडून रोकड लंपास करण्याची बारामतीतील काही दिवसातील ही दुसरी घटना आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com