बारामती- पुणे ई बससेवा सुरू

बारामती- पुणे ई बससेवा सुरू

Published on

बारामती, ता. २६ : प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत अखेर बारामती आगाराने इलेक्ट्रिक बसचा प्रयोग राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (ता. २६) बारामती- पुणे मार्गावर ही पहिली बस धावली. अत्यंत सुखद अनुभव अशा शब्दात प्रवाशांनी या बसचे स्वागत केले. विनाआवाज व वातानुकूलित आरामदायी असलेल्या बसला पहिल्याच दिवशी प्रवाशांनी प्रतिसाद दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या सूचनेनुसार या बस बारामतीत सुरू करण्यात आल्या आहेत.
बारामती आगाराला पुणे विभागाकडून पाच इलेक्ट्रिक बस देण्यात आल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेण्यासाठी काही दिवस या बस बारामती- पुणे- बारामती या मार्गावर चालविण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक रविराज घोगरे यांनी दिली. प्रदूषणविरहित, आरामदायी व कोणताही आवाज नसलेल्या या गाड्यांतून प्रवासाचा वेगळा अनुभव मिळाल्याचे प्रवाशांनी सांगितले.
अविनाश गोफणे यांच्या हस्ते चालकांचा सत्कार करत या बसचा प्रारंभ करण्यात आला. या बसचे बारामती- पुणे या मार्गासाठी २८१ रुपये इतके तिकीट असेल. साध्या गाडीचे तिकीट १७७ रुपये असून, शिवशाहीचे तिकीट २६४ रुपये इतके आहे. शिवशाहीबाबत असंख्य तक्रारी आल्यानंतर इलेक्ट्रिक बससेवा सुरू केली आहे.

बारामती आगारात होणार चार्जिंग स्टेशन
सध्या बारामती आगारात इलेक्ट्रिक बस चार्जिंगची सुविधा नसल्याने पुण्यातील स्वारगेट येथे या बसेस चार्जिंग केल्या जातील. एका चार्जिंगमध्ये ३०० किलोमीटर इतकी ही बस चालत असल्याने सध्या काही अडचण नाही. दरम्यान, बारामतीतही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव सादर केला असून, लवकरच त्यावर काम सुरू होणार आहे.

अशा असतील वेळा
बारामती- पुणे (स्वारगेट) ः सकाळी ८.४५, ९.१५, ९.४५, १०.३०, ११.००, संध्याकाळी १७.३०, १८.००, १८.३०, २०.००, २०.३०
पुणे- बारामती ः सकाळी ५.३०, ६.००, ६.३०, ७.१५, ७.४५, दुपारी १४.१५, १४.४५, १५.१५, १७.०० व १७.३० वाजता

13647

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com