बारामतीत दिवसा अवजड वाहनांना बंदी

बारामतीत दिवसा अवजड वाहनांना बंदी

Published on

बारामती, ता. १ : वाढलेले अपघात व त्यात बळी जाणाऱ्या नागरिकांचीही वाढती संख्या विचारात घेत अखेर पोलिसांनी बारामती शहरातून अवजड वाहतुकीस दिवसा प्रवेश बंदी केली आहे.
शहरातील बांधकाम साहित्याच्या अवजड वाहनांना सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत महत्त्वाच्या रस्त्यांवर बंदी घालण्याचे आदेश शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेचे पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी जारी केले आहेत. सकाळी सात ते रात्री नऊ या काळात शहरात ही बंदी असेल. खडी, क्रश, सँड, माती, मुरूम यांची वाहतूक करणारी किंवा चार ब्रास व त्याहून अधिक क्षमता असलेले ट्रक, टिपर, डंपर यांना शहरात सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तीन हत्ती चौक, भिगवण, गुनवडी, इंदापूर, गांधी चौक या सारख्या गर्दीच्या ठिकाणी सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत या वाहनांना प्रवेश करता येणार नाही. बारामती शहराच्या हद्दीत या वाहनांचा वेग ताशी ३० किमी. इतकाच ठेवावा लागणार आहे.
बारामती शहर हद्दीतील सम्यक चौक, महात्मा फुले, खंडोबानगर, सातव, गुणवडी, गांधी, फलटण चौक, वाबळे हॉस्पिटल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, बस स्थानक, मोतीबाग, कोर्ट कॉर्नर, सिटी ईन चौक, पेन्सिल चौक या ठिकाणी आता नवीन आदेशानुसार रात्री नऊ ते सकाळी सात या वेळेतच वाहतूक करता येणार आहे.

सम्यक चौकामध्ये हाईट रिस्ट्रीक्टर
डंपर, टिपर, हायवा या सारख्या वाहनांचे शहरातील वाढते अपघात व नागरिकांचा प्रशासनावर वाढलेला दबाव यामुळे हा निर्णय प्रशासनास घ्यावा लागला आहे. दसरा, दिवाळीमध्ये बारामतीच्या बाजारपेठेमध्ये मोठी गर्दी असते. त्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांची वाहतूक शहरातून झाल्यास अधिक धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे.
दरम्यान, सम्यक चौकामध्ये हाईट रिस्ट्रीक्टर बसविल्याने अवजड वाहनांची वाहतूक एकदम कमी झाली आहे. वाहनचालकांच्या माहितीसाठी याचे फलक लावण्याचीही मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com