बारामतीत सुशोभिकरणातील अनेक दिवे बंद

बारामतीत सुशोभिकरणातील अनेक दिवे बंद

Published on

बारामती, ता. १० : सुशोभीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत कोट्यवधी रुपयांचा निधी आणला, सुशोभीकरण करण्यातही आले. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे त्याचा नागरिकांना नीट फायदा मिळत नाही.
बारामती शहरात अनेक रस्त्यांवर सुंदर सुशोभीकरण केले गेले. या रस्त्यांवर अनेक ठिकाणी सुशोभीकरण केल्यानंतर नव्याने आकर्षक दिवे व या सुमधुर संगीत ऐकता यावे, यासाठी स्पीकर्सही बसविण्यात आले आहेत. भिगवण रस्त्यावर तीन हत्ती चौकापासून ते थेट विद्या कॉर्नर चौकापर्यंत अशी रचना केली आहे. या शिवाय साठवण तलाव, गरुड बाग, देवीच्या मंदिरानजीकचा भाग या ठिकाणी याचे काम झालेले आहे.
अनेकदा संध्याकाळी व पहाटेही या आकर्षक दिव्यांपैकी अनेक खांबावरील दिवे बंद असतात, तर काही स्पीकर्सवरील संगीतही बंद असते. खराब झालेले दिवेही लवकर बदलले जात नाहीत. काही ठिकाणी आवाज कमी तर काही ठिकाणी मोठा अशीही स्थिती पाहायला मिळते. ऋतुचक्राप्रमाणे दिवे कधी सुरू करायचे व बंद करायचे याचे शास्त्र आहे. प्रत्यक्षात प्रशासनापैकी कोणीही याकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही, असा अनुभव आहे. खुद्द उपमुख्यमंत्र्यांनीच काटेवाडीवरून येताना बंद दिवे पाहून प्रशासनाची कानउघाडणी केली होती.
याची जबाबदारी नेमकी सार्वजनिक बांधकाम विभागाची की नगरपरिषदेची हेही स्पष्ट होत नाही. अनेकदा सकाळी फिरायला निघालेल्या नागरिकांना दिवे असल्याने अंधारातूनच जावे लागते. कारण दिवे बंद करण्याची वेळ बदलली जात नाही. या बाबतची जबाबदारी निश्चित करून सर्व दिवे लागतील, संगीतही योग्य व योग्य आवाजात वाजेल याची काळजी प्रशासनाने घेण्याची नागरिकांची मागणी आहे.

शहरातील पथदिव्यांबाबतही ओरड कायमच
शहरातील अनेक पथदिवे बंद असतात, तक्रार करूनही ते बदलले जात नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. या बाबत एजन्सी नियुक्त केली असून, त्यांना लाखो रुपये दिले जातात, असे असतानाही नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण वेळेत होत नाही, असे काही नागरिकांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com