डॉ. आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी : बनसोडे

डॉ. आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी : बनसोडे

Published on

बारामती, ता. १३ : ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही प्रेरणादायी असून या विचारांचे अनुकरण सर्वांनी करायला हवे,’’ अशी अपेक्षा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली.
धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त प्रसिद्ध गायक साजन विशाल यांचा बुद्ध आणि भीमगीतांचा कार्यक्रम, बौद्ध समाजाचा मेळावा नुकताच बारामतीत झाला. त्या प्रसंगी बनसोडे बोलत होते. या प्रसंगी राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनील मगरे, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, बाजार समितीचे सभापती विश्‍वास आटोळे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी विविध मान्यवरांना समाजरत्न आणि आंबेडकरी चळवळीत मोलाचे योगदान देणाऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, अजित कांबळे, सुशांत जगताप, अमोल वाघमारे, मिलिंद कांबळे, नीलेश मोरे, देविदास गायकवाड, विक्रमपंत थोरात, सागर गायकवाड, नितीन शेलार, अरविंद बगाडे, केशव भोसले, जवाहरलाल सोनवणे, अप्पा आढाव, नानासाहेब लोंढे, गणेश साळवे, गणपत शिंदे, श्रीनाथ शेलार, अमर भोसले, रोहन गायकवाड, विशाल गायकवाड, प्रशिक कांबळे, समीर गायकवाड, सुनील बनसोडे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com