बारामतीचे पासपोर्ट कार्यालय जीर्ण इमारातीत
बारामती, ता. १९ : शहरातील पोस्ट ऑफिस पासपोर्ट कार्यालय धोकादायक इमारतीत सुरू असून या इमारतीचा काही भाग कोसळल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
देशभरातील पोस्ट कार्यालयात केंद्र सरकारने पासपोर्ट कार्यालय सुरू केली. स्थानिकांना पासपोर्टसाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागू नये, असा या मागचा उद्देश होता. बारामतीत देखील असेच पासपोर्ट कार्यालय २०१८ मध्ये सुरू झाले. बारामतीतील पोस्ट कार्यालयाची इमारत सन १९७० मध्ये उभारण्यात आली आहे. ही इमारत उभारून आता ५५ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट देखील करण्यात आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. या इमारतीच्या भिंतीतील लोखंडाचे गज बाहेर आलेले असून इमारत जीर्ण अवस्थेत आहे. याच इमारतीतील तीन खोल्यांत पासपोर्ट कार्यालय सुरू आहे. पुण्यातील पासपोर्ट कार्यालयात लवकर अपॉईंटमेंट मिळत नसल्याने बारामतीचा पर्याय आता अनेक पुणेकरही निवडू लागले आहेत.
दररोज साधारणपणे ८० अपॉईंटमेंट बारामतीत होतात, त्यामुळे येथे वर्दळ मोठी असते. या पार्श्वभूमीवर या इमारतीतील पासपोर्ट कार्यालयाचे स्थलांतर करावे, अन्यथा नवीन इमारत उभारावी अशी मागणी होत आहे. बैठक व्यवस्था पुरेशी नसल्याने अनेकांना उभे राहावे लागते. छोट्या खोल्यांत हे कार्यालय कार्यान्वित असल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. मूलभूत सुविधांचा अभाव येथे असल्याने याबाबत या कार्यालयाच्या स्थलांतराची मागणी होत आहे. पुरेसे पार्किंगही नसल्याने रस्त्यावरच चारचाकी वाहने उभी होत असल्याने स्थानिक नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो.
3966
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

