बारामतीमध्ये जिवंत सातबारा मोहीम टप्पा २

बारामतीमध्ये जिवंत सातबारा मोहीम टप्पा २

Published on

बारामती, ता. २४ : तहसील कार्यालयामार्फत २६ डिसेंबर ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत जिवंत सातबारा मोहीम टप्पा २ चे आयोजन केले आहे. या मोहिमेचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे.
या मोहिमेअंतर्गत सात बारा अद्ययावत करणे, यामध्ये नोंद कमी करणे, इतर हक्कातील महिला वारस नोंदी कब्जेदार सदरी घेणे, सातबाऱ्यावरील इतर अनावश्यक कालबाह्य नोंदी कमी करणे, रहिवास विभागातील तुकडेबंदीचे व्यवहार विनामुल्य नियमित करणे, लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत पत्नीचे नाव सातबाऱ्यावर नोंद करणे ही सर्व कामे विनामुल्य केली जाणार असून याकरिता कोणत्याही प्रकारच्या शुल्काची आकारणी करण्यात येणार नाही.
नागरिकांनी अर्जासोबत संबंधित सातबारा आणि फेरफार संलग्न केल्यास नोंदी जोडव्यात, याकामी संबंधित महसूल मंडळातील मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्ज आणि संबंधित कागदपत्रे जमा केल्यास २६ जानेवारीपूर्वी नोंदी नियमितीकरण केले जाणार आहे. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मोहीम स्वरूपात देण्याचे नियोजन केले असल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com