बारामतीतील शिबिरात २५० जणांचे रक्तदान
बारामती, ता. १४ : शारदानगर (ता. बारामती) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कै. चंद्रभागा शंकरराव काळे देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मृतीदिनानिमित्त बारामतीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये कांतिलाल शंकरराव काळे, रवींद्र शंकरराव काळे, सचिन नंदकुमार काळे, सागर चंद्रकांत काळे, सूरज सुरेश काळे, सुमीत चंद्रकांत काळे, श्रीनिवास सुरेश काळे, विराज दत्तात्रेय काळे, प्रतीक कांतिलाल काळे यांच्यासह काळे कुटुंबीय व तसेच ॲड. सचिन वाघ, अमोल काटे, सुधीर पानसरे, बिरजू मांढरे, जयदीप तावरे, राम खरात, वैभव खंडाळे, सूरज सातव, रामभाऊ जगताप सहभागी झाले होते. बारामती एमआयडीसीसह बारामती परिसरातील अनेक युवकांनी उत्स्फूर्तपणे या शिबिरात रक्तदान केले. या शिबिरामध्ये २५० पिशव्या रक्त जमा झाले. बारामती पंचक्रोशीमध्ये सध्या रक्ताचा मोठा तुटवडा जाणवत असल्याने या पार्श्वभूमीवर आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिरासारखा समाजोपयोगी उपक्रम उद्योजक रवींद्र काळे व त्यांच्या कुटुंबीयांनी राबविल्याने या उपक्रमात सहभागी झाल्याचे अनेक युवकांनी नमूद केले. दरम्यान, गुरुवारी (ता. १५) प्रथम पुण्यस्मृतीदिनानिमित्त शारदानगर येथे साध्वी वैष्णवी दीदी सरस्वती यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी १० वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी कार्यक्रम होणार आहे.
14248
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

