बारामती खरेदी-विक्री संघाला
अजितदादांचे नाव

बारामती खरेदी-विक्री संघाला अजितदादांचे नाव

Published on

बारामती, ता. ३ : येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य व शेतकऱ्यांचा कणा असलेल्या बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या संचालक मंडळाने आज संस्थेच्या नामांतराचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
आज झालेल्या संचालक मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत संस्थेचे नामांतर करून ‘अजितदादा पवार बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ’ असे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय एकमताने घेण्यात आला. संघाचे अध्यक्ष ॲड. रवींद्र माने, उपाध्यक्ष नितीन देवकाते, व्यवस्थापक नीलेश लोणकर यांच्यासह संचालक मंडळाने या बाबत माहिती दिली.
बारामती तालुक्यातील सहकार व कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान देणारे अजित पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संचालक मंडळाकडून देण्यात आली. आपल्या राजकीय जीवनाचा प्रवास अजित पवार यांनी बारामतीतील याच खरेदी विक्री संघाच्या कार्यालयातून केला होता. या कार्यालयात सुरुवातीला बसून ते स्थानिकांचे प्रश्न सोडवत असत.
संस्थेच्या या नामांतराच्या निर्णयामुळे सभासद व शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, अजितदादांच्या नावाने ही संस्था भविष्यात अधिक वेगाने प्रगती करेल, असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.

संघाचे उपक्रम
बारामती तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये माफक दरात दर्जेदार खते, औषधे व बी-बियाणे पुरवठा, बारामती व एमआयडीसी परिसरात आधुनिक सुविधांनी युक्त पेट्रोल-डिझेल पंप, शेतमाल विक्री आडत, कृषी निविष्ठा विक्री केंद्र तसेच औषध दुकानाचा समावेश आहे.


सहकार क्षेत्रात दादांचे योगदान
अजितदादांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात सहकार क्षेत्रातूनच केली. त्यांच्या नेतृत्वाखाली बारामतीतील सहकारी संस्थांनी केवळ राज्यातच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्थांच्या वार्षिक सभांना उपस्थित राहून त्यांनी वेळोवेळी कामकाजाचा आढावा घेतला असून, बदलत्या काळात टिकून राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या दूरदृष्टीतूनच खरेदी-विक्री संघाचे कामकाज अधिक पारदर्शक व आधुनिक झाले आहे. त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी नामांतराचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com