पिंपळीत अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार

पिंपळीत अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार

Published on

बारामती, ता. ४ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अस्थी-कलश नीरा नरसिंगपूर येथे विसर्जनासाठी नेत असताना दौंड, बारामती व इंदापूर तालुक्यातील विविध गावांत दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पिंपळी-लिमटेक, काटेवाडी, भवानीनगर आदी ठिकाणी अस्थिकलश नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला.
पिंपळी (ता. बारामती) येथे ग्रामस्थांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनीही अस्थिकलशाचे दर्शन घेतले. त्यानंतर कलश नीरा- नरसिंगपूरकडे विसर्जनासाठी रवाना करण्यात आला, अशी माहिती जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.
याप्रसंगी पिंपळी गावातील प्रमुख पदाधिकारी, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक, बारामती तालुका खरेदी-विक्री संघाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक-युवती, महिला पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

14390

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com