शासकीय कार्यालयांमध्ये बारामतीत स्मार्ट मीटर
बारामती, ता. ११ : महावितरणाने बारामती परिमंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याचे काम १०० टक्के पूर्ण केले आहे. याबाबत महावितरणने माहिती दिली. डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्युत वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे यात नमूद केले आहे. बारामती परिमंडळातील ३१ हजार ८९९ शासकीय वर्गवारीतील ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविले आहेत. त्यात बारामती मंडळात ८०३५, सातारा मंडळात १२ हजार ५५५ तर सोलापूर मंडळातील ११ हजार ३०९ शासकीय वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश आहे. स्मार्ट मीटर बसविण्याचा हा उपक्रम डिजिटल इंडिया, सुधारित वितरण क्षेत्र योजना तसेच राज्य शासनाच्या तंत्रज्ञानाधिष्ठित प्रशासनाच्या धोरणाशी सुसंगत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये स्मार्ट मीटर बसविल्यामुळे आता कार्यालयांना वीज वापराची अचूक व रिअल-टाइम माहिती मिळणार आहे. मीटर रिडींगमधील मानवी हस्तक्षेप टळल्याने वीजबिल अचूक व वेळेत मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

