विद्या प्रतिष्ठानच्या अभियांत्रिकीचा माजी विद्यार्थी मेळावा
बारामती, ता. १२ : येथील विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या वतीने माजी विद्यार्थी मेळावा नुकताच पुण्यात पार पडला. माजी विद्यार्थी आणि संस्थेमधील नाते दृढ करणे तसेच प्लेसमेंट, इंटर्नशिप आणि उद्योग-शैक्षणिक सहकार्याची संधी वाढविणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता.
प्राचार्य डॉ. एस. बी. लांडे यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
प्लेसमेंट, इंटर्नशिप आणि शैक्षणिक समृद्धीसाठी त्यांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सूत्रसंचालन डॉ. व्ही. सी. तोडकरी यांनी केले. प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी ज्योती कुलकर्णी व एच. पी. बोराटे यांनी संस्थेच्या प्लेसमेंट उपक्रमांची माहिती देत माजी विद्यार्थ्यांना भरती प्रक्रिया, इंटर्नशिप व मार्गदर्शनासाठी सहकार्याचे आवाहन केले. याप्रसंगी झालेल्या संवाद सत्रात विविध क्षेत्रांत कार्यरत माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली. प्रसाद घोंगडे यांची अध्यक्षपदी, तर प्रवीण काशीद यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. पी. आर. चित्रागर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

