बारामती निवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात

बारामती निवडणुकीत 
२३ उमेदवार रिंगणात
Published on

बारामती, ता. ९ : येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी (ता. ९) एकूण ३० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आता २३ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल रावडे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून, २३ एप्रिल रोजी बारामतीचे मतदान होणार आहे. ४ मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी ५५ उमेदवारांनी ६८ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या पैकी छाननीमध्ये दोन उमेदवारांचे सहा अर्ज बाद ठरविले गेले. शेवटी ५३ उमेदवार रिंगणात राहिले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर आता २३ उमेदवार रिंगणात उरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com