बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान
Published on

बारामती, ता. २२ : येथील बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आवश्यक मतदान साहित्य व कर्मचारी बुधवारी (ता. २२) संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना करण्यात आले. बारामतीतील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या एमआयडीसी गोदामातून ही प्रक्रिया पार पडली.
विधानसभा मतदारसंघातील यंत्रे ६० बंदिस्त मिनी टेम्पोद्वारे क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे केंद्रांवर पोहोचविण्यात आली. यंदा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वितरण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्निल रावडे यांनी सांगितले की, मतदान पथकांना डिस्पॅच सेंटरवर न बोलावता थेट त्यांच्या मतदान केंद्रांवर जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक साहित्यही थेट केंद्रांवर पोहोचविण्यात आले आहे. मतदारसंघ ६० झोनमध्ये विभागण्यात आला असून प्रत्येक झोनसाठी एक क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे. प्रत्येक अधिकाऱ्याकडे सुमारे ८ ते १० मतदान केंद्रांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ईव्हीएम यंत्रांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र कंटेनरची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे स्वतःचे वाहन नाही, त्यांच्यासाठी ३० बसेसची सोय करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com