

बारामती, ता. ७ : कामगार सप्ताहानिमित्त क्रेडाई बारामतीच्या वतीने बुधवारी (ता. ५) ‘लेबर अवेअरनेस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन कामगारांना नोंदणीचे आवाहन करण्यात आले.
क्रेडाई सभासद उद्धव गावडे यांच्या साइटवर आयोजित या कार्यक्रमात कल्याणकारी मंडळाचे अधिकारी शंकर बारवकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कामगारांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य उपचार, निवास सुविधा आणि आर्थिक साहाय्य मिळवण्यासाठी शासनाकडे नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच, प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली.
यावेळी क्रेडाई बारामतीचे अध्यक्ष दत्तात्रेय बोराडे म्हणाले की, ‘‘शासनाच्या योजना तळागाळातील कामगारांपर्यंत पोहोचवण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त आहेत.’’
या प्रसंगी राहुल खटमोडे, सिद्धार्थ जाचक, आयोजक उद्धव गावडे, उपाध्यक्ष राजेंद्र खराडे, संदीप मेळगर, संदीप धवलशंक यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.