Mon, Jan 30, 2023

चाकण येथे युवकाची
राहत्या घरी आत्महत्या
चाकण येथे युवकाची राहत्या घरी आत्महत्या
Published on : 1 January 2023, 3:48 am
चाकण, ता. १ : चाकण (ता. खेड) येथील धाडगे मळ्यात एका तरुणाने सायंकाळी साडेचारच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. माणिक बळवंत सोनवणे (वय २२), असे या तरुणाचे नाव आहे. तो व्यवसाय करत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण समजले नाही, अशी माहिती पोलिस ठाण्याचे अंमलदार जयदीप सोनवणे यांनी दिली.
याबाबतची फिर्याद माणिक याच्या बहिणीने दिली आहे. त्यानुसार घरी आई, वडील व मोठा भाऊ नसताना माणिक याने किचनमधील छताच्या अँगलला नायलॉन दोरी अडकवून गळफास घेतला. त्यावेळी घरात त्याची बहीण होती. तिने याबाबतची माहिती मोठ्या भावाला दिली. त्यांनी लटकलेल्या माणिक याला खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.