नाणेकरवाडीच्या पदपथावर व्यवसायिकांचे अतिक्रमण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाणेकरवाडीच्या पदपथावर व्यवसायिकांचे अतिक्रमण
नाणेकरवाडीच्या पदपथावर व्यवसायिकांचे अतिक्रमण

नाणेकरवाडीच्या पदपथावर व्यवसायिकांचे अतिक्रमण

sakal_logo
By

चाकण, ता. १३ : येथील नगरपरिषदेच्या हद्दीतील जुन्या पुणे-नाशिक मार्गाच्या पदपथावर (वॉकिंग ट्रॅक) पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. या पदपथासाठी दोन वर्षांपूर्वी तीन कोटी रुपये खर्च केला होता पण त्याच्‍यावर पथारीवाले, भाजीपाला व्यवसायिकांनी संपूर्ण व्यापून टाकलेला आहे.
चाकण (ता. खेड) नगरपरिषदेच्या हद्दीतील नाशिक मार्गाला जोडणारा नाणेकरवाडी फाटा रस्ता ते मार्केट यार्ड चाकण पर्यंत पदपथ तयार करण्यात आला.
या पदपथाची साडेतीन ते चार फूट रुंदी वाढविण्यात आली आहे. परंतु नागरिकांना चालण्यासाठी गैरसोईचे झाले आहे. नगरपरिषदेने वाहनांच्या पार्किंगच्या खुणा व ट्रॅक पांढऱ्या रंगाने काढले आहेत. परंतू त्यावर पथारीवाले, भाजीपाला व्यावसायिक बसत आहेत. त्यामुळे वाहने पार्किंग करायची कोठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.


भाजीपाला व्यावसायिक, पथारीवाले यांच्यावर आम्ही कारवाई करतो. परंतु ते लोक पुन्हा अतिक्रमण करून बसतात. त्यामुळे पदपथ या लोकांच्या अतिक्रमणामुळे व्यापला आहे. पथारी वाल्यांना, भाजीपाला व्यावसायिकांना पर्यायी जागा कुठे द्यायची हा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडून पदपथ मोकळा करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
- सुनील बल्लाळ, मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद.


नागरिकांची गैरसोय
चाकण नगर परिषदेच्या अंतर्गत जुन्या पुणे-नाशिक मार्गाला दोन्ही बाजूने तीन कोटी रुपये खर्च करून पदपथ सुमारे दीड किलोमीटर अंतराचा तयार करण्यात आला. त्याच्यावरून नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना ये जा करता येत नाही. त्यामुळे पदपथ नेमका कोणासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे.