चाकणमध्ये दोघांना अज्ञातांकडून मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकणमध्ये दोघांना
अज्ञातांकडून मारहाण
चाकणमध्ये दोघांना अज्ञातांकडून मारहाण

चाकणमध्ये दोघांना अज्ञातांकडून मारहाण

sakal_logo
By

चाकण, ता. २४ : चाकण (ता. खेड) येथील आंबेठाण रस्त्यावर ‘चौधरी ट्रेडर्स’ दुकानाजवळ दोन
अज्ञात तरुणांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण केली. याबाबत ओंकार अरविंद तरकसबंद (वय ३०, रा. चाकण) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी दिली.
हा प्रकार सोमवारी (ता. २४) रात्री बाराच्या सुमारास घडला. तरकसबंद हे त्यांच्या एका नातेवाईकाला आणण्यासाठी तळेगाव चौकात मोटार घेऊन गेले होते. त्यांनी एकाला त्यांच्या मोटारीमध्ये लिफ्ट दिली. त्या व्यक्तीने चौधरी ट्रेडर्स दुकानाजवळील एका खोलीत जातो, असे सांगितले. ती व्यक्ती खोलीकडे जात असताना त्या व्यक्तीला, तसेच फिर्यादी ओंकार याला दोघा अज्ञातांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.