कांद्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांना चिंता

कांद्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांना चिंता

Published on

चाकण, ता. ८: येथील (ता. खेड) महात्मा फुले बाजारात आज (ता. ८) नव्या कांद्याची सुमारे साडेतेरा हजार पोत्यांची आवक झाली. सुमारे ६७५० क्विंटल आवक झाली. कांद्याला प्रति किलोला घाऊक बाजारात किमान दहा ते कमाल चौदा रुपये भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत.

कांद्याला कमी भा मिळाल्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नाही. बाजारभाव कमीत कमी प्रति किलोला वीस रुपयांच्या पुढे असावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कांद्याचे भाव घसरत असल्याचे कांदा व्यापारी माणिक गोरे ,विक्रम शिंदे यांनी सांगितले. चाकण येथील महात्मा फुले बाजार हा कांदा खरेदी -विक्रीसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. या बाजारातील कांद्याचे भाव राज्यात गणले जातात. चाकण येथील बाजारातून कांद्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. निर्यातीसाठी कांदा खरेदी करण्यासाठी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कर्नाटकातील व्यापारी, निर्यातदार कंपन्या येथे वास्तव्य करतात. निर्यातीचे प्रमाण अत्यल्प असल्याने सध्या देशांतर्गत कांद्याची खरेदी- विक्री होत असल्याने निर्यातदार कंपन्या, व्यापारी येथे सध्या आलेले नाहीत, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.

चाकण येथून देशांतर्गत मुंबई,कोकण भाग, दिल्ली, बंगळूरू, केरळ, चेन्नई, उत्तर प्रदेश ,मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक आदी भागात कांदा विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात पाठविला जात आहे. परराज्यातील व्यापारी कांदा खरेदीसाठी बाजारात येत आहेत तसेच ऑनलाइन संपर्क साधून खरेदी करत आहेत. नवीन कांद्याची आवक फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढेल, असे व्यापारी विक्रम शिंदे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम गोरे, व्यापारी माणिक गोरे, जमीरभाई काझी, प्रशांत गोरे पाटील, बाळासाहेब गायकवाड यांनी सांगितले.

04982

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.