Wed, March 29, 2023

कुरुळीतील एकावर मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल
कुरुळीतील एकावर मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल
Published on : 19 February 2023, 11:23 am
चाकण, ता. १९ : कुरुळी (ता. खेड) येथील कपड्याच्या दुकानातील उधारीचे पैसे मागण्यास गेलेल्या फिर्यादीला शुक्रवारी (ता.१७) एकाने लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मधुकर चव्हाण (वय ४३, रा. चिंबळी, ता. खेड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. यानंतर आरोपी परमानंद रामसिंग अहिरबाद (वय २७, रा. कुरुळी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने कपड्याच्या उधारीचे पैसे देतो असे सांगून फिर्यादीला बोलावले होते. फिर्यादी आरोपीकडे गेला होता. तेव्हा ही घटना घडली, अशी माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली.