खराबवाडीत लांबविल्या २ कोटी रुपयांच्या मशिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खराबवाडीत लांबविल्या
२ कोटी रुपयांच्या मशिन
खराबवाडीत लांबविल्या २ कोटी रुपयांच्या मशिन

खराबवाडीत लांबविल्या २ कोटी रुपयांच्या मशिन

sakal_logo
By

चाकण, ता. २२ : खराबवाडी-वाघजाईनगर (ता. खेड) येथील टचईलॅस्टिक्स कंपनीमधील सुमारे दोन कोटी रुपये किमतीच्या २१ मशिन चोरीला गेल्या. याबाबत प्रसन्नजित शितलचंद्र दास (वय ४८, रा. पिंपरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर आरोपी गणेश संभाजी माळी (रा. शिवाजीनगर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला.
याबाबत महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व पोलिस निरीक्षक किशोर पाटील यांनी माहिती दिली की, फिर्यादीच्या मालकीच्या कंपनीतील अंदाजे दोन कोटी रुपये किमतीच्या २१ मशिन आरोपी माळी यांच्या शेडमध्ये होत्या. त्या दास यांना मिळून आल्या नाहीत. याबाबत त्यांनी माळी याच्याकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही.