येलवाडी येथे मजुराला लुटणाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येलवाडी येथे मजुराला लुटणाऱ्यास अटक
येलवाडी येथे मजुराला लुटणाऱ्यास अटक

येलवाडी येथे मजुराला लुटणाऱ्यास अटक

sakal_logo
By

चाकण, ता. १४ : येलवाडी (ता. खेड) येथे सांगुर्डी फाट्याजवळ दुचाकीवर चाललेल्या मजुराला चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी बाळासाहेब ऊर्फ बाळू हनुमंत ढोरे (रा. इंदुरी, ता. मावळ) याला अटक केली आहे.
याबाबत मंगेश खंडू गडगिळे (वय २४, रा. विठ्ठलवाडी-देहूगाव, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. ते कान्हेवाडी येथून विठ्ठलवाडीकडे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीला फिर्यादीच्या दुचाकीचा हॅन्डल लागून दुचाकीचा आरसा फुटला. या कारणावरून, ‘नुकसान दे’ म्हणून आरोपी ढोरे याने त्यांच्याकडे पैसे मागितले. मात्र, त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपी ढोरे याने चिडून त्यांच्या पोटाला चाकू लावला व त्यांच्या खिशातील साडेचार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे, अशी माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी यांनी दिली.