Sat, March 25, 2023

मोई येथील तरुणावर
बलात्कारप्रकरणी गन्हा
मोई येथील तरुणावर बलात्कारप्रकरणी गन्हा
Published on : 15 March 2023, 3:33 am
चाकण, ता. १५ : फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याप्रकरणी मोई (ता. खेड) येथील तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. नीलेश अमृत मोरे (वय ३०), असे त्याचे नाव आहे.
महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी माहिती दिली की, या प्रकरणी विवाहित महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीने फिर्यादी महिलेचे अंघोळ करतानाचे अर्धनग्न फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार तीन वर्षापासून घडत होता.