पन्नास लाखांच्या मालाचा कुरुळीत कामगाराकडून अपहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पन्नास लाखांच्या मालाचा
कुरुळीत कामगाराकडून अपहार
पन्नास लाखांच्या मालाचा कुरुळीत कामगाराकडून अपहार

पन्नास लाखांच्या मालाचा कुरुळीत कामगाराकडून अपहार

sakal_logo
By

चाकण, ता.१९ : येथील औद्योगिक वसाहतीतील कुरुळी (ता. खेड) गावच्या हद्दीतील महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामामधून सुमारे ५० लाख रुपयांच्या मालाचा अपहार केल्याप्रकरणी आरोपी अमोल उत्तम गंजे (वय ३०, रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कंपनीच्या वतीने अमित विरबहादूर सिंग (वय ४५, रा. जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा कंत्राटी कामगार आहे. कंपनीच्या गोदामामध्ये विविध साहित्य ठेवण्यात आले होते. मागील तीन महिन्याच्या कालावधीत कंपनीचा विश्वासघात करून या मालाचा अपहार स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचे फिर्यादीत नमूद केल्याचे महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी सांगितले.
....