चाकण बाजारात टोमॅटो ८० रुपये प्रति किलो

चाकण बाजारात टोमॅटो ८० रुपये प्रति किलो

Published on

चाकण, ता.८ : चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजारात आज (ता.८) सुमारे दहा ते वीस टन टोमॅटोची आवक झाली. त्यास घाऊक बाजारात ७० ते ८० रुपये प्रति किलोला बाजारभाव मिळाला. शंभर रुपयाला वीस, पंचवीस किलोचा मिळणारा क्रेट बाजारात सध्या दोन हजार रुपयाला मिळत आहे.

जिल्ह्यात एक दोन महिन्यापूर्वी टोमॅटोचा असलेला चार ते पाच रुपये प्रती किलोचा भाव होता. राज्यातील पावसाचा अनियमितपणा, गारपीट, प्रतिकूल हवामानामुळे टोमॅटोच्या आगार असलेल्या जिल्ह्यात टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. टोमॅटोचे पीक काही भागात गारपिटीने गेले, यामुळे उत्पादन कमी झाले, यामुळे टॉमोटोने भाव वाढले आहेत, अशी माहिती खेड बाजार समितीचे सभापती कैलास लिंभोरे, व्यापारी रवींद्र बोराटे, आबा गोरे, संजय वहिले, गणेश झगडे, कुमार गोरे यांनी दिली.

राज्यात तसेच देशातील टोमॅटोचे भाव १२० ते दीडशे रुपयांवर गेले आहेत, असे वास्तव आहे. घाऊक बाजारात ७० ते ८० रुपये एका किलोंनी विकला जात आहे. परंतु किरकोळ बाजारात तो १००, १२०, १५० रुपये एका किलोने विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मात्र टोमॅटो खरेदी करत नाही असेही वास्तव आहे.

दरम्यान, जून महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापर्यंत अगदी प्रतवारीनुसार पाच, दहा, पंधरा रुपये प्रति किलो भाव असलेल्या टोमॅटोचा भाव जूनअखेरीपासून वाढला. या महिन्याच्या सुरुवातीला हे भाव दहा, पंधरा पटीने वाढले आहेत.

काही हॉटेलात सलाडमध्ये टोमॅटोची कमी
टोमॅटोच्या भाव वाढीमुळे काही हॉटेल व्यावसायिक सलाडमध्ये टोमॅटो देत नाहीत. टोमॅटो हा सलाडमध्ये तसेच पावभाजी मध्ये अत्यावश्यक घटक आहे. टोमॅटो महाग झाल्यामुळे सॅण्डविच, पावभाजी, बर्गर आदी पदार्थामध्ये टोमॅटोचा वापर काही ठिकाणी कमी होत आहे. टोमॅटोच्या भाव वाढीने हॉटेल, उपाहारगृहामधील खाद्यपदार्थाच्या किमती सध्या वाढल्या नाहीत, असे हॉटेल व्यावसायिक सागर बनकर, रामदास गायकवाड, बाळासाहेब कड, दत्ता खांडेभराड यांनी सांगितले.
..................

05614

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.