एक आदर्श समाजसेवक, जलदूत

एक आदर्श समाजसेवक, जलदूत

मुळचे घाटनांदूर (ता.अंबाजोगाई, जि. बीड) येथील श्याम वालेकर यांनी भारतीय सैन्यात सतरा वर्षे सेवा बजावल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात तलाठी म्हणून सेवेला सुरुवात केली. सैन्यात असताना त्यांची कामगिरी कौतुकास्पद होती. तत्कालीन उपविभागीय अधिकारी महेश आव्हाड यांनी एका बैठकीत तलाठी समाजातील एक उत्तम सेवक ठरू शकतो, असे सांगितले होते. त्यातून वालेकर यांनी प्रेरणा घेऊन गोरगरीब, गरजवंतांना मदत करण्याचा निर्धार केला. खोलीकरणासारखी कामे केल्यामुळे त्यांना जलदूत म्हणून ओळखले जाते.
श्याम वालेकर, तलाठी

निराधार महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. गावातील वाड्या वस्तीवरील रस्ते करून दिले. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी करमाळा तालुक्यातील चार गावातील ओढ्याच्या सुमारे २० किलोमीटर अंतरातील गाळ काढून खोलीकरण केले. सरकारचा एक रुपया ही न घेता सावडी व इतर गावात जलक्रांती केली. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे,तहसीलदार संजय पवार, उपविभागीय अधिकारी मनीषा कुंभार यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. दुष्काळी सावडीला जलक्रांतीमुळे सुबत्ता आली. जिल्हाधिकारी मुंडे यांनी वालेकर यांना आदर्श तलाठी म्हणून पुरस्कृत केले. जिल्हाधिकारी गेडाम यांनी ही त्यांना आदर्श तलाठी म्हणून पुरस्कृत केले होते. सावडीचे जलदूत म्हणून वालेकर यांना ओळखले जाते. पुणे जिल्ह्यात बदली झाल्यानंतर तलाठी म्हणून महाळुंगे, मेदनकरवाडी, कडाचीवाडी येथे काम केले. लॉकडाउनच्या काळात कोरोना संसर्ग आपल्या परिसरात होऊ नये यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले.

कोरोना काळात घेतली कामगारांची काळजी
चाकण औद्योगिक वसाहतीत देशभरातील कामगार काम करतात. त्यांच्या बेरोजगारीचा व पोटापाण्याचा प्रश्न भेडसावत होता. कामगार उपाशी राहू नयेत म्हणून पोलिस व महसूल प्रशासन काम करत होते. कामगार मजुरांच्या जीवनाचा प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र झटून कोणी उपाशी राहणार नाही याची दखल वालेकर हे कोरोना काळात घेत होते. गोरगरीब मजूर कामगारांना त्यांच्या घरी जाऊन शिधा व जेवणाचे वाटप त्यांनी केले.अगदी दीड लाखावर कामगार मजूर होते त्यातील कोणी उपाशी राहू नये त्यासाठी महसूल प्रशासन काम करत होते.

सरकार व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काम
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महसूल ग्रुप वर मेसेज टाकून ही आपत्ती परीक्षेची घडी आहे मजूर, कष्टकरी, कामगार यांची उपासमार होणार नाही यासाठी प्रयत्न करा असे सांगितले. खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली यांनीही अशा सूचना दिल्या होत्या. खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम सुरू केले. सकाळी सात वाजता दिवस सुरू होऊन रात्री बारापर्यंत त्यांचे काम चालत होते. नागरिकांना धान्य मिळावे यासाठी सरकार व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी काम केले. त्यावेळी वालेकरांनी महाळुंगे कोविड सेंटरमध्ये रुग्णांना सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले. कोरोना काळात वालेकर यांनी कोरोना रुग्णांना मदत केली. याबाबत ते नेहमी म्हणतात, ‘‘लोकसेवा, रुग्णसेवा ही माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे काम ठरले आहे. कोविड काळात कोविड रुग्ण यांच्यासाठी मी कामे केली ही माझ्या आयुष्यातील महत्त्वाची बाब आहे.’’ जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून सन २०२२२-२३ साठीचा आदर्श तलाठी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. सावडी ता.करमाळा या गावाशी असलेले प्रेम तेवत ठेवण्यासाठी या गावात अधून मधून ते भेट देऊन या गावासाठी अजून काय करता येईल हे मनोभावे करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

सावडी येथील वृक्षारोपण ठरले लक्षवेधी
श्याम वालेकर यांनी ऑगस्ट २०२३ मध्ये सुमारे शंभर झाडे जिल्हा परिषद शाळा सावडी, हायस्कूल दिलेली आहे. ग्रामस्थांच्या उपस्थितीत चिंच,जांभळ, वड,करंजी, गुलमोहर व इतर रोपांचे वृक्षारोपण केले. ती सावडी ग्रामस्थांनी योग्यरीत्या जोपासली आहेत.
सावडी गावातील शाळेत व परिसरात जवळपास तीनशे झाडांचे वृक्षारोपण केले आहे. या वृक्षारोपणामुळे आज कडक उन्हात शीतल छाया मिळत आहे. ऑक्सिजन मिळत असल्याने सावडी
ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.


06925, 18836

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com