चाकण खासदार आढळराव पाटील भाषण

चाकण खासदार आढळराव पाटील भाषण

विरोधी उमेदवाराचा जनतेशी
संपर्कच नाही : आढळराव

चाकण, ता. ११ : ‘‘जनतेच्या प्रश्नांची मला जाण आहे. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मी विकासकामे केली आहेत. कोरोना काळात मी घरी न बसता फिरत राहून नागरिक, रुग्णांना मदत केली आहे. जनतेशी माझा मोठा संपर्क आहे. जे विरोधी उमेदवार खासदार आहेत, त्यांनी पाच वर्षे कोणत्याही गावात, जनतेशी संपर्क ठेवला नाही. ते अभिनेते आहेत, त्यांना जनतेचे प्रश्न समजत नाहीत आणि समजणारही नाही,’’ असे शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
चाकण (ता. खेड) येथे बाजार आवारात झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेत आढळराव पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘‘जनतेचा मला मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे मी नक्की निवडून येणार आहे. विरोधी उमेदवार पराभवाच्या भीतीने वैयक्तिक खालच्या पातळीवर टीका करत आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षांत काही विकास कामे न केल्यामुळे त्यांना माझ्यावर वैयक्तिक टीका करावी लागत आहे’’

शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले...
- चाकण येथील वाहतूक कोंडी, तसेच रस्त्याचे प्रश्न मार्गी लावणार आहे.
- पुणे-नाशिक महामार्गाचे काम नक्की होणार आहे.
- शेतकरी, कामगार सर्वांचे प्रश्न मी सोडविण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे.
- पुणे- नाशिक रेल्वेमार्ग पाठपुरावा करून मी पूर्ण करणारच आहे.

‘काम ने केल्याने वैयक्तीक टीका’
‘‘विरोधी उमेदवाराकडून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे. पण जनता सुज्ञ आहे. जनता विकास कामे करण्याला निवडून देणार आहे,’’ असे आढळराव पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com