कडाचीवाडी येथे बिबट्याचे दर्शन

कडाचीवाडी येथे बिबट्याचे दर्शन

Published on

चाकण, ता. ८: कडाचीवाडी (ता. खेड) येथील बापदेव वस्ती येथे सोमवारी (ता.८) सकाळी साडेनऊच्या सुमारास शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. बिबट्या वावर आढळल्याने शेतकरी वर्गात, महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बिबट्या जवळून गेल्याने शेतकरी श्रीरंग कड यांनी वनविभागाला कळविले. यामुळे चाकण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याच्या ठशांची तपासणी केली. ठसे आढळल्याने चाकण वनविभागाच्या वतीने कॅमेरा लावण्यात येणार असून, पिंजरा ही बसविण्यात येईल, असे चाकण वनपरिक्षेत्राचे अधिकारी संतोष कंक यांनी सांगितले.
कडाचीवाडीच्या हद्दीतील बापदेव वस्तीवर यापूर्वी बिबट्याचा वावर होता. एका उसाच्या शेतात उसाची काढणी सुरू असताना बिबट्या आढळला होता. त्यानंतर तो पसार झाला. पाझर तलाव परिसरात बिबट्याने कुत्र्याची शिकार केली होती.
दरम्यान, कडाचीवाडी व परिसरात बिबट्या बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शेतकरी, महिला यांनी शेतात काम करत असताना दक्ष राहावे असे आवाहन कंक यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.