भटक्या कुत्र्यांचा मुलावर हल्ला

भटक्या कुत्र्यांचा मुलावर हल्ला
Published on

चाकण, ता. १५: मेदनकरवाडी (ता. खेड) येथे वेद हाईट सोसायटीमध्ये राहणाऱ्या श्रेयस नीलेश बिजवे (वय ६)या अल्पवयीन मुलावर शाळेतून घरी येताना भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्यात अल्पवयीन मुलगा जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. यापूर्वीही दोन- तीन मुलांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता. चाकण व परिसरातील गावात वाड्या, वस्त्यांवर पिंपरी -चिंचवड महापालिकेने सोडलेली भटकी कुत्री परिसरात अगदी दहा ते बाराच्या समूहाने फिरत आहेत. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा उप द्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मेदनकरवाडी येथे यापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला होता. या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी योगेश मेदनकर, बाळासाहेब कड व इतरांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com