प्लॅस्टिक फूल विक्रेते कोमात तर शेतकरी जोमात
चाकण, ता.२९ : दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आदी सणात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या फुलांचा, तोरण, माळा, पाने आदींचा वापर केला जातो. परंतु राज्यसरकारने प्लॅस्टिक फुलांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. याबाबत जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे. श्रावणामुळे फुले तेजीत आहेत तर प्लॅस्टिकच्या फुलांची, सजावटीच्या साहित्याची विक्री करणारे व्यावसायिक मात्र कोमात आहे, असे चित्र जिल्ह्यातील बाजारपेठांत दिसत आहे.
गणेशोत्सवात घरगुती व गणेश मंडळाच्या आराससाठी कृत्रिम प्लॅस्टीकच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. गणेशोत्सवात व इतर सणात प्लॅस्टिकच्या फुलांना मोठी मागणी होती. कृत्रिम प्लॅस्टिकच्या फुलांच्या विक्रीतून राज्यात व्यवसायिकांची कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत होती. राज्यसरकारने कृत्रिम प्लॅस्टिक फुलांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. याबाबत फलोत्पादनमंत्री भरत गोगावले यांनी नुकतीच घोषणा केली आहे. सणांच्या काळात प्लॅस्टिक फुलांचा वापर वाढला होता. यामुळे नैसर्गिक फुलांचा बाजार फूल उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला आहे. नैसर्गिक फूल शेती करायची की नाही हाही प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. सध्या अनेक कार्यक्रम, छोटे, मोठे समारंभ, विवाह सोहळे, वाढदिवसाचे कार्यक्रम यामध्येही प्लॅस्टिकच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. त्यामुळे मोठ्या शहरात अगदी पुणे, मुंबई, दादर फुलांचा बाजार,नागपूर, पिंपरी चिंचवड, नाशिक, अहिल्यानगर व इतर शहरात नैसर्गिक फुलांना पाहिजे तेवढी मागणी मिळत नव्हती. त्यामुळे राज्यातील सुमारे कोट्यवधी रुपयांचा नैसर्गिक फुलांचा व्यवसाय अडचणीत आला होता. झेंडू, गोंडा या फुलांचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत होता. प्लॅस्टिक फुलांच्या विक्रीवर बंदी घातल्याने आता शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे.
अशी आहे सध्याची स्थिती
१. नैसर्गिक फुलापेक्षा प्लॅस्टिक फुलांचे भाव
२. कृत्रिम फुले नेहमी ताजी दिसतात.
३. नैसर्गिक फुलांचे आयुर्मान एक ते दोन दिवस
४. सध्या नागरिकांचा प्लॅस्टिकच्या फुलांकडे कल
५. गणेशोत्सवात प्लॅस्टिकच्या फुलांना मागणी अधिक.
६. नैसर्गिक फुले दररोज बदलावी लागल्याने खर्च अधिक
राज्य सरकारने कृत्रिम प्लास्टिकच्या फुलांना बंदी आणल्याने गणेशोत्सव व इतर सणासाठी प्लॅस्टिक तसेच कापडाची फुले विक्रीसाठी ठेवली आहेत. यामध्ये कापडाची फुले, गुलाब, मोगरा व इतर फुले आहेत. या फुलांच्या किमती अधिक असल्यातरी ही फुले दोन ते तीन वर्षे चांगली टिकतात तसेच विद्युत रोषणाईत आकर्षक दिसतात. त्यामुळे कापडाच्या फुलांनाही मागणी आहे.
- पियुष कर्नावट, कापडी फूल विक्रेते
राज्य सरकारने प्लास्टिकच्या फुलावर बंदी आणली तरी अनेक पळवाटा आहेत. कापडाची फुले बाजारात येत आहेत. शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी नैसर्गिक फुले ग्राहकांनी विकत घेतली पाहिजेत. त्यामुळे फूल उत्पादक शेतकरी जगेल?
- मुचकुंद जाधव, शेतकरी
असे शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते सांगितले.
08916
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.