चाकण वाहतूक विभागाच्या 
वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी वाघ

चाकण वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी वाघ

Published on

चाकण, ता. ५ : चाकण वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी प्रमोद वाघ यांची नियुक्ती झाली. चाकणमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर असताना नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याने कोंडी सुरळीत होईल व वाहतूकीसंदर्भाचे प्रश्न सुटतील अशी आशा नागरिक, कामगार, उद्योजक यांना आहे. नियुक्तीनंतर वाघ यांनी सांगितले की,‘‘चाकणचा वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. तो सर्वांना विश्वासात घेऊन तसेच सहकार्याने सोडविण्याचे प्रयत्न केले जातील.’’

Marathi News Esakal
www.esakal.com