पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा

Published on

चाकण, ता. २९ : नाणेकरवाडी (ता. खेड) येथे शुक्रवारी (ता. २९) सकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने दहा जणांना चावा घेतला. यामध्ये तीन वर्षांच्या लहान मुलालाही चावा घेतला असून तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जात आहे, अशी माहिती चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन कांबळे यांनी दिली.
चाकण- आंबेठाण मार्गावर झित्राईमळा येथेही एका पिसाळलेल्या कुत्र्याने सकाळी पावणेसातच्या सुमारास शाळेत चाललेल्या एका पादचारी महिला शिक्षिकेला हाताला चावा घेतला. त्यात महिला शिक्षिका जखमी झाली. इतरही दहा नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. दरम्यान, चाकण नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना याबाबत संपर्क साधला; परंतु कोणीही प्रतिसाद दिला नाही. चाकण येथील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला असून प्रशासनाची याकडे डोळेझाक होत आहे. तरी नगरपरिषदेसह प्रशासनाने आतातरी खडबडून जागे होत भटक्या कुत्र्यांवर कारवाई, करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राम गोरे, चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन कांबळे यांनी केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com