चाकणला कोंडीमुळे थांबली मिरवणूक
चाकण : येथील शहरात (ता.खेड) सायंकाळी व रात्री उशिरा बैलांच्या मिरवणूक झाल्या. बैलांच्या मिरवणुका पुणे-नाशिक महामार्गावर सिग्नल लागल्यानंतर थांबल्या. वाहतूक कोंडीमुळे बैलांच्या मिरवणुकीला थांबावे लागले. वाजंत्री वाद्यांच्या गजरात बैलांच्या मिरवणुका निघाल्या. मिरवणुकीत बैलगाडा शर्यतीचे बैल तसेच पारंपरिक मशागती करणारे बैल सहभागी झाले होते. तसेच बैलगाडा मालक, कार्यकर्ते, शौकीन, तरुण यांचा मोठा उत्साह होता.
पुणे नाशिक महामार्गावर आंबेठाण चौकात लाल सिग्नल लागला. वाहतूक कोंडी झाली आणि बैलांनाही त्या सिग्नलची वाट पाहावी लागली. त्यानंतर मिरवणुका पुढे निघाल्या. औद्योगिक वसाहतीमुळे येथील शेतीचे प्रमाण कमी झालेले असले तरी काही शेतकऱ्यांनी अजूनही बैल परंपरेनुसार सांभाळले आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी तसेच शेतीच्या मशागतीसाठी बैलांचा वापर केला जातो असे सुदाम शेवकरी यांनी सांगितले.