ट्रकची दुचाकीला धडक;
एका कामागाराचा मृत्यू

ट्रकची दुचाकीला धडक; एका कामागाराचा मृत्यू

Published on

चाकण, ता. २२ : महाळुंगे (ता. खेड) गावच्या हद्दीतील मार्गावर ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या एका तरुण कामगाराचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (ता. २१) दुपारी अडीचच्या सुमारास घडला. दोघे दुचाकीवरून जाताना इंडूरन्स कंपनी चौकातून एचपी चौकाकडे वळताना पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने (क्र. एमएच १४ एलएक्स ९३२८) दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पाठीमागे बसलेला तुफान दिलीप मोंडल (वय २५, सध्या रा. चाकण, मूळ रा. कावबसा, पो. मंदरबोनी, पश्चिम बंगाल) याचा मृत्यू झाला. त्याचा मित्र सुभजीत गोस्वामी (वय २५, रा. नाणेकरवाडी, चाकण) यांनी पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती महाळुंगे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली.

Marathi News Esakal
www.esakal.com