चाकणला अतिक्रमणधारकांची मोठी दहशत
चाकण, ता. २३ : येथील जुन्या पुणे- नाशिक वाहनांसाठी असला तरी या मार्गावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात पथारीवाले, व्यावसायिक, हातगाडीवाले रस्ता अडवत आहेत. या मार्गाचे रूपांतर अतिक्रमण धारकांनी चक्क भाजीमंडईमध्ये केले आहे. ही अतिक्रमणे काढायला प्रशासन, पोलिसही घाबरतात. कारण येथे अतिक्रमणधारकांची मोठी दहशत आहे, असा आरोप नागरिक, कामगार करीत आहेत.
चाकण (ता. खेड) येथील पुणे- नाशिक महामार्ग, चाकण- तळेगाव, चाकण- शिक्रापूर, चाकण- आंबेठाण मार्गावरील अतिक्रमणे काही प्रमाणात काढली आहेत. माणिक चौकातही काही पक्क्या बांधकामांवर हातोडा टाकला. मात्र, पथारीवाले, व्यावसायिक यांनी चाकण बस स्थानकाच्या आवारात मोठा अड्डा केला आहे. जिथे अतिक्रमण काढली तिथेच ते बसत आहेत. त्यामुळे ये- जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.
जुन्या पुणे- नाशिक मार्गाचे तीन कोटी रुपये खर्चून सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे. या मार्गावर अतिक्रमणधारक बसतात. त्यामुळे रस्ता फक्त १० ते १५ फूट रुंदीचा राहिला आहे. मात्र, व्यावसायिक, पथारीवाले काहीच ऐकत नाहीत. परिसरात अतिक्रमणधारकांची मोठी दहशत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन, नाणेकरवाडी ग्रामपंचायत कारवाई करत नाही. वाहनांच्या अगदी दोन किलोमीटरवर शिक्रापूर बाजूकडे रांगा लागतात.
याबाबत खेडचे प्रांताधिकारी अनिल दौंडे यांनी सांगितले की, ‘‘नगर परिषदेने अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करणे गरजेचे आहे.’’ चाकण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अंकुश जाधव यांनी नगरपरिषदेच्या हद्दीतील अतिक्रमणे काढू, असे सांगितले.
अतिक्रमणधारकांच्या टोळ्या
अतिक्रमण धारकांच्या टोळ्या आहेत. त्या टोळ्या अतिक्रमण काढण्याच्या विरोधात आवाज उठवतात. जे अतिक्रमण काढा म्हणतात त्यांच्यापुढे दहशत करतात. त्यामुळे अतिक्रमण कारवाईला सगळेच घाबरत आहेत. त्यामुळे पूर्णपणे अतिक्रमण कारवाई होतच नाही. लाखो रुपये अतिक्रमण धारकांना मिळतात. यामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गुंतले आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई प्रशासनाकडून झाली तरच अतिक्रमणे निघतील. नाहीतर जैसे थे परिस्थिती राहणार आहे. अतिक्रमणाकडे राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते का लक्ष देत नाही? असा सवाल नागरिक कामगारांचा आहे.
ग्रामपंचायत कारवाई करते मात्र, ते लोक काही ऐकत नाहीत. ते पुन्हा अतिक्रमण करतात. पोलिस ठाण्यालाही आम्ही पत्र दिले आहे. पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.
- छाया इरणक, ग्रामविकास अधिकारी, नाणेकरवाडी
09371
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.