चाकण वाहतूक विभाग नको रे बाबा

चाकण वाहतूक विभाग नको रे बाबा

Published on

चाकण, ता. २३ : औद्योगिक वसाहतीमुळे दररोज लाखो वाहने ये- जा करणाऱ्या चाकण परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांइतकाच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही बसत आहे. वाहतूक कोंडीमुळे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचा वाढणारा मानसिक ताण, आरोग्याची हेळसांड, सातत्याने होणारी टीका यामुळे पोलिस अधिकारी, कर्मचारी अक्षरशः हैराण झाले आहेत
चाकण वाहतूक विभागाला पोलिस अधिकारी, कर्मचारी कंटाळले आहेत. अधिकारी, कर्मचारी वाढवले तरी रस्ते फारच अरुंद आहेत. चाकण परिसरात औद्योगिक वसाहतीमुळे दररोज सुमारे एक लाखांवरून वाहने ये- जा करतात. त्यात वाढलेली अतिक्रमणे, लोकांचा त्रास, पथारीवाले, व्यावसायिकांचा त्रास, अतिक्रमण काढण्याबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी सोडवायची कशी असा प्रश्न पोलिसांनाही पडत आहे.
मार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तासनतास उभे राहायचे, त्यातून काही लोकांनी दादागिरी करायची, अगदी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही धावून जायचे, महिला कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालायची, एखादे वाहन अडवले, पकडले तर राजकीय नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा दबावही सोसायचा, असे प्रकार सातत्याने घडत आहेत.
पिंपरी चिंचवड आयुक्तालयात पोलिस अधिकारी, कर्मचारी चाकण वाहतूक विभाग नको रे बाबा असे म्हणतो आहे. चाकण सोडून दुसरीकडे पोस्ट द्या अशी आग्रही विनंती करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अधिकारी, कर्मचारीही कंटाळले
गेल्या दोन महिन्यापूर्वी चाकण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून प्रमोद वाघ यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र, त्यांची दोन महिन्यातच दिघी पोलिस ठाण्याला बदली झाली आहे. त्यामुळे येथे वरिष्ठ अधिकारी का टिकत नाही ही चर्चा आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक वाहतूक विभागाची जबाबदारी घेण्यासही कंटाळले आहेत. त्यामुळे चाकण वाहतूक विभागाचे पुढे नक्की काय होते? हे मात्र पुढील काळ ठरवणार आहे. मार्गावर उभ्या राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची अवस्था त्याहीपेक्षा बिकट आहे. यामुळे सामान्य नागरिक, कामगार यांना मात्र काहीच कळत नाही असे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com