चाकण नागरी पतसंस्थेतर्फे १५ टक्के लाभांश
चाकण, ता. ५ : येथील चाकण नागरी सहकारी पतसंस्थेला मागील वर्षात एक कोटी ५० लाख २० हजाराच्या पुढे विक्रमी नफा झालेला आहे. त्यामुळे सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ कांडगे, उपाध्यक्ष लक्ष्मण वाघ व संचालक मंडळाने दिली.
पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी संस्थेचे सभासद माणिक गोरे, अशोक जाधव, कालिदास वाडेकर, भगवान कांडगे, वसंत गोरे, पांडुरंग गोरे, मच्छिंद्र गोरे, उमेश आगरकर, विद्यमान संचालक नितीन गोरे, नीलेश टिळेकर, गिरीश गोरे, सुनील नायकवाडी, नवनाथ शेवकरी, अशोक बिरदवडे, सुरेश कांडगे, बाळासाहेब साळुंखे, प्राजक्ता गोरे, साधना गोरे, राहुल परदेशी, तज्ज्ञ संचालक प्रकाश भुजबळ, नीलेश जाधव, सल्लागार अंकुश पवार, सुभाष गोरे आदी उपस्थित होते. यावेळी कांडगे यांनी सांगितले की ,"संस्थेची शाखा खालुंब्रे येथे कार्यरत आहे व पाच नवीन शाखा उघडण्यास परवानगी मिळालेली आहे. त्यापैकी एक शाखा कुरुळी चिंबळी फाटा येथे सुरू करण्यात आलेली आहे. या संस्थेला पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड पुणे यांनी स्वर्गीय आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्कार २०२५ यावर्षी गट क्रमांक तीनमधील (५० कोटी ते १०० कोटी ठेवी) पुणे जिल्ह्यातील असलेल्या पतसंस्थांमधून प्रथम क्रमांकाचा पुरस्कार दिलेला आहे. माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांच्या स्मरणार्थ गौरव पुरस्कार उपक्रम संस्थेच्या वतीने येत्या १० ऑक्टोबरला राबविण्यात येणार आहे.
संस्थेकडे भाग भांडवल पाच कोटीवर आहे.संस्थेकडे ठेवी ६८ कोटी वर आहे. संस्थेने सभासदांसाठी कर्ज ५६ कोटीवर दिलेले आहे, असे सचिव अनिल धाडगे यांनी सांगितले.