चाकणला मतदार यादीत घोळ

चाकणला मतदार यादीत घोळ

Published on

चाकण, ता.११: खेड तालुक्यातील चाकण नगर परिषदेच्या मतदार यादीत मोठा घोळ निर्माण झाला आहे. त्यामुळे उमेदवार आणि मतदार हे संभ्रमात पडले आहेत.
प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्येक इच्छुकांच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. हालचाली सुरू झाल्यानंतर मतदार यादीला विशेष महत्त्व आले आहे. त्यामुळे मतदार यादीत कोणाचे नाव कोठे आहे, कोणाचे नाव कोणत्या प्रभागात आहे ही चाचपणी इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते यांची अतिशय उत्साहात सुरू झाली आहे. काहीजण या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नावे गेल्यामुळे नाराज आहेत. त्यामुळे हरकतींचा पाऊस पडत आहे. प्रारूप मतदार यादीतील एक नंबर प्रभागातील नावे चार नंबर प्रभागात गेलेली आहेत. इतर प्रभागातही नावे या प्रभागातून त्या प्रभागात गेलेली आहेत. त्यामुळे मतदारांनी, उमेदवारांनी नेमके करायचे काय असा प्रश्न उमेदवार, मतदारांचा आहे. प्रत्येक प्रभागात हा सावळा गोंधळ आहे. प्रत्येक प्रभागातील साधारणपणे ३०० ते ४०० मतदार वेगवेगळ्या प्रभागात विभागलेले आहेत. त्यामुळे ज्या प्रभागात अनेक वर्षे जे वास्तव्य करतात त्या प्रभागातील मतदारांना नेमके मतदान कोठे करायचे हा प्रश्न पडला आहे, असे सागर बनकर, सुयोग शेवकरी यांनी व इतरांनी सांगितले.
नगर परिषदेच्या वतीने मतदार यादीतील दुरुस्तीसाठी अर्ज मागविले आहेत; परंतु दुरुस्त्या नक्की कशा होणार हा सवाल इच्छुक उमेदवार, कार्यकर्त्यांचा आहे. दरम्यान, चाकण शहरातील नागरिक , मतदार यांनी आपल्या प्रभागातील प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची पडताळणी करून आपले नाव जर आपल्या प्रभागात नसेल तर त्यांनी त्यावर हरकती/ सूचना अर्ज येत्या सोमवार (ता. १३) पर्यंत चाकण नगर परिषद कार्यालयात देऊन आपले नाव आपल्या प्रभागात घ्यावे, मतदार यादी दुरुस्ती, हरकत तक्रार करण्यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशीही नगरपरिषद कार्यालय खुले आहे.

मतदार यादीत दुरुस्ती करण्यासाठी योग्य ती कागदपत्रे नागरिक, मतदार यांनी नगर परिषदेच्या कार्यालयात अर्ज सहित सादर करावयाचे आहेत. याबाबत योग्य तो निर्णय नगर परिषद मंगळवारी (ता. २८) देणार आहे. एखाद्या व्यक्तीचे घर एका प्रभागात तसेच दुसऱ्याही प्रभागात असते. त्यामुळे तो नागरिक, मतदार ज्या प्रभागात राहत आहे तो प्रभाग त्याला मान्य आहे त्या प्रभागातच त्याचे नाव मतदार यादीत ठेवले जाईल. चाकण शहराची २०११च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ४१ हजार ११३ आहे. ही लोकसंख्या कागदोपत्री असली तरी प्रत्यक्षात लोकसंख्या सुमारे दीड लाखांवर आहे. या निवडणुकीसाठी मतदार ३३ हजार १७८ आहेत. मतदार यादीतील दुरुस्तीसाठी आजपर्यंत १८० अर्ज आलेले आहेत अजूनही अर्ज येतील.
- डॉ. अंकुश जाधव, मुख्याधिकारी, चाकण नगर परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com