पुणे
शेलगावात पावणेपाच लाखांचे दागिने लंपास
चाकण, ता.१४ : चाकण-शिक्रापूर मार्गावर शेलगाव दत्तवाडी (ता.खेड) येथे सोमवारी (ता. १३) रात्रीच्या सुमारास एका घराच्या पाठीमागील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील सोन्या, चांदीचा ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञात चोट्यांविरोधात चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती चाकणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय सोळंके यांनी दिली. याप्रकरणी भगवान झरेकर यांनी फिर्याद दिली आहे . पुढील तपास चाकण पोलिस करीत आहेत.