चाकण नगरपरिषदेसाठी ३६ ईव्हीएम
चाकण, ता. १ : येथील नगरपरिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकपदाच्या २२ जागांसाठी तसेच नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी ३६ मतदान केंद्र सज्ज झाली आहेत. या मतदान केंद्रात ३६ मतदान यंत्र(ईव्हीएम) आहेत. मतदान यंत्रात बिघाड झाल्यास तत्काळ मतदान यंत्र उपलब्ध व्हावीत यासाठी १२ मतदान यंत्र राखीव ठेवलेली आहेत. मतदान यंत्राचे उमेदवारा समक्ष मॉकपोल घेतलेला आहे. उमेदवारांच्या समस्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत. प्रत्येक मतदान यंत्र चाचणी व्यवस्थित तपासणी करून मतदानासाठी ठेवलेली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी दिली.
डॉ. अंकुश जाधव म्हणाले की, ‘‘मतदान केंद्राच्या बाहेर १००, उमेदवारांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना २०० मीटरवर बूथ लावता येणार आहेत. १००, २०० मीटरवर पांढरी फक्की टाकून लाइन (मार्किंग) टाकण्यात येणार आहे. सीसीटीव्ही किंवा वेबकास्टिंग सुविधा केंद्रात करण्यात आलेली नाही. निवडणूक साहित्य, मतदान यंत्र यांची वाहतूक सुरक्षा व्यवस्थेत एसटी बसमधून करण्यात आलेली आहे. मतदार जनजागृतीसाठी जागोजागी फलक लावले आहेत. ध्वनिफितीद्वारे मतदारांचे प्रबोधन करण्यात येत आहे. मतदारांसाठी सेल्फी पॉईंट ठेवलेले आहेत. आचारसंहितेचे कडेकोट नियमन होण्यासाठी तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतदान केंद्रावर प्राथमिक उपचार सुविधाही ठेवण्यात आली आहे. हिरकणी कक्ष आहेत.’’
चाकण शहरात तीन ठिकाणी स्थिर देखरेख पथके आहेत तसेच दोन भरारी पथके, एक छायाचित्रण पथक आहे. पैसे वाटप व मद्यवाटप काही ठिकाणी होत असेल व इतर वस्तूंचे वाटप होत असेल त्यावर निरीक्षण ठेवण्यासाठी पोलिसांची पथके तैनात आहेत. मतदान केंद्रावर सुरक्षा तसेच शहरात सुरक्षेसाठी ३०० पोलिस अधिकारी व कर्मचारी आहेत. यामध्ये राज्य राखीव पोलिस दल, आरसीपी, सशस्त्र पोलिस दल, होमगार्ड आदी ठेवलेले आहेत. चाकण शहरात कोणतेही मतदान केंद्र संवेदनशील नाही.
- संजय सोळंके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, चाकण
मतदान केंद्रातील सुविधा
दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर, साहाय्यक स्वयंसेवक, रॅम्प सुविधा
पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था
मतदान केंद्र ही साधारणपणे शाळेच्या खोल्या आहेत
प्रतीक्षा रांगेसाठी मार्किंग
मतदारांच्या रांगेत शिस्त राहावी यासाठी सुरक्षा व्यवस्था प्रत्येक मतदान केंद्रावर तैनात
मतदार :
पुरुष : १७२६२
महिला : १५८६२
तृतीयपंथी :०१
एकूण : ३३१२५
9800
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

