पुणे
चाकणमध्ये गांजा जप्त
चाकण, ता. २० : येथील चक्रेश्वर मंदिराच्या कमानीजवळ असलेल्या एका पान टपरीच्या पाठीमागे झाडाच्या आडोशाला सुमारे ४५ हजार पाचशे रुपये किमतीचा ९३२ ग्रॅम वजनाचा गांजा हा अमली पदार्थ बेकायदेशीररीत्या विक्री करताना एकाला अटक केली. वैभव संजय शिंदे (वय १९, रा. चाकण, ता. खेड), असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती उत्तर चाकण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वैभव शिंदे याने चक्रेश्वर मंदिराच्या रस्त्यावरील कमानी जवळील पानटपरीच्या पाठीमागे झाडाच्या आडोशाला गांजा लपवून ठेवला होता. शुक्रवारी (ता. १९) दुपारी सव्वादोनच्या सुमारास त्याच्याकडून ९३२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला.

