सांस्कृतिक कार्यक्रमांची परदेशी नागरिकांना भुरळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांस्कृतिक कार्यक्रमांची 
परदेशी नागरिकांना भुरळ
सांस्कृतिक कार्यक्रमांची परदेशी नागरिकांना भुरळ

सांस्कृतिक कार्यक्रमांची परदेशी नागरिकांना भुरळ

sakal_logo
By

चास, ता. २८ ः चास (ता. खेड) येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची इटली येथील परदेशी पाहुण्यांनाही भुरळ पडली. जवळपास एक तास हा कार्यक्रम पाहून फोटो काढत उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत दादही दिली.
शिरूर- भिमाशंकर राज्यमार्गालगत ग्रामपंचायतीच्या भव्य प्रांगणात शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना या मार्गावरून जाणारे इटलीचे नागरिक अँन्ड्रिया व पावोलो कि जे भारतात पर्यटनाला आले आहेत. त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विद्यार्थी सादर करत असलेला ढोल लेझीमचा कार्यक्रम दृष्टीस पडला. ते आपली गाडी थांबवून हा कार्यक्रम पहावयास आले. त्यांना या कार्यक्रमाची गोडी लागल्यावर त्यांनी फोटो काढत सर्व कार्यक्रम पाहिले. टाळ्या वाजवून दादही दिली तसेच कार्यक्रमा दरम्यान स्टेजवर जाऊन विद्यार्थ्यांशी संवादही साधला. त्यांच्या रसिकपणाची दखल घेत गावचे सरपंच विनायक मुळूक, उपसरपंच जावेद इनामदार, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय घनवट यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते अँन्ड्रिया व पावोलो यांचा सत्कार करण्यात आला व त्यानंतर ते भीमाशंकरकडे मार्गस्थ झाले.

0562