Sat, March 25, 2023

बुरसेवाडीत बिबट्याचा
चार बोकडांवर हल्ला
बुरसेवाडीत बिबट्याचा चार बोकडांवर हल्ला
Published on : 28 January 2023, 9:30 am
चास, ता. २८ : बुरसेवाडी (ता. खेड) येथे शुक्रवारी (ता. २७) रात्री बिबट्याने दोन बोकडांचा फडशा पाडला; तर दोन बोकड पळवून नेले.
बुरसेवाडी येथील अशोक जयराम कोंढावळे यांच्या मालकीच्या घराजवळील गोठ्यावर शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटेच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला. त्यात बांधलेले नऊ महिने वयाच्या बोकडांना बिबट्याने लक्ष केले. गोठ्यातील दोन बोकड गळ्याजवळ चावा घेऊन ठार करत त्यांचे काही शरीराचे भागही खाल्ले व गोठ्यातील अन्य दोन बोकड ओढून जंगलात नेले. या घटनेची माहिती कळताच वनविभागाचे वनपाल गिरीश कुलकर्णी, वनरक्षक संदीप अरुण यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व जंगलात नेलेल्या दोन बोकडांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.