Thur, March 30, 2023

वाहनाच्या धडकेत
सांबर हरिण ठार
वाहनाच्या धडकेत सांबर हरिण ठार
Published on : 4 February 2023, 2:17 am
चास, ता. ४ : बुरसेवाडी (ता. खेड) येथे शिरूर-भीमाशंकर राज्य मार्गावर शुक्रवारी (ता. ३) रात्री ते शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने वन्यप्राणी सांबर हरिण ठार झाले, ते पाच वर्ष वयाचे नर असल्याची माहिती वनपाल गिरीश कुलकर्णी यांनी दिली.
या घटनेची माहिती कळताच वनपाल गिरीश कुलकर्णी, वनसेवक ज्ञानेश्र्वर बुरसे व शांताराम बुरसे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या संगीता तनपुरे, रमेश जरे यांनी वनविभागाला सहकार्य केले. शवविच्छेदनानंतर मृत सांबरावर अग्निसंस्कार केले.