''शाश्वत''तर्फे आदिवासी महिलांना रोजगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''शाश्वत''तर्फे आदिवासी महिलांना रोजगार
''शाश्वत''तर्फे आदिवासी महिलांना रोजगार

''शाश्वत''तर्फे आदिवासी महिलांना रोजगार

sakal_logo
By

चास, ता. ७ : महिलांनी स्वयंपूर्ण व्हावे व व्यवसायातून चरितार्थ चालवावा या उद्देशाने शाश्वत संस्थेच्या वतीने खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील ८० आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध करून व्यवसायाशी निगडित साधनेही मोफत दिली आहेत.
खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्यातील महिलांना व्यवसाय उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून शाश्वत संस्था, मंचर व सिनेकॅान कंपनीच्या अर्थसहाय्याने खेडच्या पश्चिम आदिवासी भागातील येळवळी, भोरगिरी, विठ्ठलवाडी, शिरगांव व मंदोशी येथील महिलांना प्रत्येकी अंडी देणाऱ्या बारा कोंबड्या तसेच पन्नास किलो कोंबडखाद्य मोफत देण्यात आले. या कार्यक्रमासाठी शाश्वत संस्थेच्या प्रतिभा तांबे, सुलाताई गवारी, तेजश्री कसबे यांसह शांताराम गुंजाळ, दत्ता तिटकारे, नीलेश काठे, उषा बानेरे, अलका हुरसाळे, यमन हुरसाळे, नंदा गभाले, सखूबाई दाते यांसह लाभार्थी महिला उपस्थित होत्या.
---------------------
00602