खेडमध्ये तीन ठिकाणी वीज कोसळली

खेडमध्ये तीन ठिकाणी वीज कोसळली

चास, ता. १० : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात रविवारी सायंकाळी वीज कोसळल्याच्या तीन घटना घडल्या. त्यामध्ये एका व्यक्तीने आपला जिव गमावला, तर दोन झाडांचे वीज कोसळल्याने नुकसान झाले.
रविवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्याने, विजेच्या कडकडाटाने व ढगांच्या गडगडाटाने चासकमान परिसरात दहशत पसरवली. सुमारे दीड ते दोन तास चाललेल्या या पावसाने जनजीवन विस्कळित झालेच, पण वीज कोसळल्याच्या तीन घटना घडल्या. चास येथे राम गंगाराम काळे हे आपल्या घराच्या मागच्या अंगणात बसलेले असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने ते जागीच ठार झाले. कमान येथे कांतिलाल रामभाऊ नाईकरे यांच्या नारळाच्या झाडावर वीज कोसळल्याने झाड जळाल्याप्रमाणे झाले असून, वीज कोसळल्यावर कित्येक वेळ या झाडातून प्रकाश येत होता. तिसऱ्या घटनेत कमान येथे ज्ञानेश्र्वर तुकाराम नाईकरे यांच्या जांभळीच्या झाडावर वीज पडून झाड मधोमध चिरले गेले असून, त्याची अनेक शकले होऊन त्याचा भाग अनेक ठिकाणी फेकला गेला.

यंत्रणेचा काय फायदा
चासकमान व परिसरात अनेक गावांमध्ये मागील वर्षी शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून वीजरोधक (वीज अटकाव यंत्र) यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. मात्र, त्याच परिसरात वीज कोसळून जर नागरिकांचा मृत्यू होत असेल, झाडांवर वीज कोसळून झाडे उद्धस्त होत असतील; तर या यंत्रणेचा काय फायदा? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com